You are currently viewing *समग्र शिक्षा अभियान अंतर्गत घारपी शाळेच्या वर्गखोली दुरुस्ती कामाचा शुभारंभ

*समग्र शिक्षा अभियान अंतर्गत घारपी शाळेच्या वर्गखोली दुरुस्ती कामाचा शुभारंभ

*समग्र शिक्षा अभियान अंतर्गत घारपी शाळेच्या वर्गखोली दुरुस्ती कामाचा शुभारंभ*

बांदा

समग्र शिक्षा अभियानांतर्गत घारपी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण झालेल्या षटकोनी वर्गखोलीच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. शाळेच्या षटकोनी वर्गखोलीची अवस्था खराब झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळा व्यवस्थापन समितीने करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्तीची कामे सुरू झाली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून दुरुस्ती कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी समितीच्या उपाध्यक्षा यशोदा गावडे, पोलिस पाटील समृद्धी गावडे, तसेच विलास गावडे, एकनाथ गावडे, रमेश गावडे, गजानन गावडे, तुकाराम गावडे, लवू गावडे, शिवराम गावडे, संजय गावडे, संतोष गावडे, संतोष कविटकर, जानकी गावडे, रिया कविटकर, सोनाली कविटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दुरुस्तीच्या कामांत छताचे मजबुतीकरण, खिडक्या–दारे दुरुस्ती, फरशीकरण यांसह आवश्यक पायाभूत सुधारणा करण्यात येणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व अनुकूल शिक्षण वातावरण उपलब्ध होणार आहे.
शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी सांगितले की, समग्र शिक्षा अभियानातून मिळालेल्या सहाय्यामुळे शाळेच्या पायाभूत सुविधांची गुणवत्ता वाढत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे आणि आशिष तांदुळे यांनी विशेष सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा