You are currently viewing सावंतवाडीमध्ये विकासाची बाजू मजबूत

सावंतवाडीमध्ये विकासाची बाजू मजबूत

सावंतवाडीमध्ये विकासाची बाजू मजबूत

प्रभाग १ मध्ये भालेकर–बेग यांना उत्साहवर्धक प्रतिसाद

युवराज लखमराजेंच्या सहभागामुळे भाजपचा प्रचार अधिक गतीमान

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील भाजप उमेदवार दिपाली भालेकर आणि राजू बेग यांनी प्रचाराची गती वाढवत जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. त्यांच्या प्रचारासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांच्यासह सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन युवराज लखमराजे भोसले यांनी मतदारांना केले. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भाजपने विशेष भर दिला असून, मतदारसंघात भालेकर आणि बेग यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली.

या दोघा उमेदवारांच्या माध्यमातून प्रभागाचा विकास नक्कीच वेग घेईल, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत. दरम्यान, प्रचारादरम्यान दीपेश शिंदे यांनी खास वेषभूषा धारण करून भाजपच्या धोरणांबाबत जनजागृती करत मतदारांचे लक्ष वेधून घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा