स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी शिबिराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत जिल्हा परिषद सिंधुदुर्गगनरीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी दिली आहे.
आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दि26 नोव्हेंबर रोजी “संविधान दिन” या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय दिनानिमित्त, “व्यक्तिमत्व विकास आणि किमान रोजगारक्षमतेचे कौशल्य शिबिर” आयोजित करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. या शिबिराचा उद्देश सहभागी विभागाच्या विविध योजनांतर्गत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, युवक यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, संवाद कौशल्य, सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे व त्याव्दारे रोजगारक्षमतेत वाढ घडवून आणणे हा आहे. तसेच याव्दारे प्रशिक्षणार्थींना आपल्या संविधानात अंतर्भूत असलेल्या जबाबदारी, समानता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांचे प्रत्यक्ष जीवनात पालन करण्यास प्रोत्साहन प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटनपर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रविंद्र खेबुडकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्याक्रमासाठी प्रमुख वक्ते, मार्गदर्शक म्हणून स्पर्धा परिक्षेत यश संपादन करुन प्रशासकिय सेवेत कार्यरत सिंधुदुर्ग कन्या अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2025 गट अ, Rank 28) सुरज देबाजे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
याकार्यक्रमात सहभागी घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/ 1FAIpQLSeU6gWUFHHiqL2symVem1Ru02zM1wbyRWmqJHH-T8IOEUtkMQ/viewform?usp=header या लिंकवर नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा.
अधिक माहितीसाठी Sindhudurg Rojgar व Facebook आणि Whatsapp Channels , दूरध्वनी क्र. 228835 ईमेल आयडी- sindhudurgrojgar@gmail.com येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्री. येरमे, यांनी केले आहे.
