मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश !
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेवल आर्ट स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादित केले. रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे कलरिंग ,कोलाज, स्केचिंग, हॅन्ड रायटिंग, मास्क मेकिंग, टॅटू मेकिंग ,कॅरी कॅचर, फिंगर अँड थम पेंटिंग ,ग्रीटिंग कार्ड, कार्टून मेकिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नर्सरी ते दहावीपर्यंतचे 496 स्पर्धक सहभागी झाले. त्यातील 231 विद्यार्थी इंटरनॅशनल लेवल आर्ट स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. कलरिंग कॉम्पिटिशन मध्ये कु.आराध्या चव्हाण हिने प्रथम क्रमांक ,कु.वैदेही गोठणकर हिने तृतीय क्रमांक,कु.वर्धन बुवा याने चतुर्थ क्रमांक पटकावला तर कार्टून मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये कु.ईश्वरी सावंत हिने द्वितीय क्रमांक मिळवला. फिंगर अँड थम पेंटिंग कॉम्पिटिशन मध्ये कु. भार्गवी वाळके हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. कु. अन्वी राठोड हिला कार्टून मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये फाईव्ह स्टार ब्रिलियंट अवॉर्ड मिळाला तर कु.अर्णव माने हा कोलाज कॉम्पिटिशन मध्ये व कु.अथर्वी मांजरेकर ही कलरिंग कॉम्पिटिशन मध्ये एक्सलंट अवॉर्डची मानकरी ठरली. या विविध स्पर्धांमध्ये 5 विद्यार्थी आर्ट मेरिट अवॉर्ड चे मानकरी ठरले तर 19 विद्यार्थ्यांनी कन्सोलेशन प्राईज व 21 विद्यार्थ्यांनी केजी गिफ्ट मिळविले. तसेच 96 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, 81 विद्यार्थ्यांनी सिल्व्हर मेडल व 60 विद्यार्थ्यांनी ब्राॅन्झ मेडल पटकावले.
तसेच स्पर्धा समन्वयक श्रीम. अमिना नाईक यांना जेमिनी रॉय अवार्ड, मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल या प्रशालेस इंडियाज ऍक्टिव्हिटीज एक्सलन्स अवॉर्ड, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम . अनुजा साळगांवकर यांना द लिडरशिप इन एज्युकेशन अवॉर्ड व संस्थेच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांना द ट्रान्स्फॉरमेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
