You are currently viewing महान स्वामीभक्त पन्नादाई

महान स्वामीभक्त पन्नादाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम कथा काव्य*

 

*महान स्वामीभक्त पन्नादाई*

 

मेवाड प्रांतातील

चित्तोडची कहाणी

ऐकताच दाटते

डोळ्यांमधे पाणी।।

 

निस्सीम स्वामीभक्तीचे

ज्वलंत उदाहरण

पन्नादाई महान

कथेचे हो कारण।।

 

महाराणा संग्रामसिंह

बालक उदयसिंह छोटे

भावी राजा राज्याचा

लालनपालन लक्ष मोठे।।

 

दाई पन्ना अतीविश्वासू

दूध पाजले अंगावरचे

पोषण केले बाळराजाचे

आणि चंदनबाळ स्वतःचे।।

 

बलबीर दुष्ट वृत्तीचा

सत्ताधीश व्हायची मनिषा

क्रूरपणे वध केले

राज्याची तीव्र अभिलाषा।।

 

कळले जेव्हा पन्नादाईस

येतोय बनवीर मारायला

पाळण्यातील उदयसिंह

झटपट तिने उचलला।।

 

मूल ठेवलं तिथे स्वतःचं

घट्ट धरलं कुशीत

आला पाळण्यापाशी

बनवीर तलवार उपशीत।।

 

कुठे आहे उदयसिंह

दरडावून तिला विचारलं

माऊलीने पाळण्याकडे

बोट आक्रंदत दाखवलं।।

 

सपकन् केला वार

बाळाला घातलं कंठस्नान

मातृत्वाचे केले हो

तिच्या देखत शिरकाण।।

 

वाचवले प्राण उदयसिंहाचे

धन्य इतिहासात अमर

पन्नादाईच्या स्वामीभक्तीने

झाले तिचे नाव अजरामर।।

 

अरुणा दुद्दलवार..@✒️

प्रतिक्रिया व्यक्त करा