*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दर्शन का न देशी…..*
तूच आहे माता तूच माझा पिता
दर्शन का न, देशी भगवंता….
कशी करू सेवा सांग जरा तरी
आणू का पितांबर तुज भरजरी
सारे देणारा तू, तूच खरा दाता…
दर्शन का न, देशी भगवंता….
पाने फुले तुझी सूर्य चंद्र तारे
वैभवाचा धनी तू च खरा रे
डोळे दीपती रे उदधी पाहता…
दर्शन का न देशी भगवंता…..
सृष्टीचा निर्माता तुज काय देऊ
सारेच रे तुझे सांग काय नेऊ
थकावी रे वाणी माझी गुण तुझे गाता
दर्शन का न देशी भगवंता….
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
