You are currently viewing प्रेम तुझ्या वर करतो मी

प्रेम तुझ्या वर करतो मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रेम तुझ्या वर करतो मी* 

 

ही वाट वळणाची

हिरव्या नागमोडीची

साक्ष देती झाडे साजनी

तुझ्या नि माझ्या प्रितीची

 

प्रेम तुझ्या वर करतो मी

नको ना हा दुरावा

तुझाच ग मी मजनु

मायेचा दे ओलावा

 

दाट धुक्यातील वाट

भरले तळे काठोकाठ

पाण्याच्या या लहरींवरती

बदके करती माना ताठ** *

 

दुरुन ऐकु आली शिळं

वाऱ्यावरती लहरी

हिरवे गालीचे पसरले

भल्या पहाटेच्या प्रहरी ***

 

प्रीती आपली दोघांमधली

बघतयं फुलपाखरू

ये, ना सखे कवेत माझ्या

नकोस अशी बावरु ***

 

नौकाविहार चल करू या

पैलतीरी त्या जाऊ या

वल्हवा टाकुन पाहु या

प्रेमगीत चल गाऊ या ***

 

प्रीतीचा ती रात्र सखी

घालीते साद आपणा

चल रंगु स्वप्नामध्ये

हात दे तुझ्या साजना

 

*शीला पाटील. चांदवड*

प्रतिक्रिया व्यक्त करा