यवतमाळ :
महाराष्ट्र लोकविकास मंच स्वयंसेवी संघटनेच्या वतीने दरवर्षाला महाराष्ट्रातून अनेक नामवंत गुणवंत कर्तत्ववान सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःच आयुष्य समर्पण केलेल्या कार्यकर्त्यांना मानपत्र, ट्रॉफी, देऊन सन्मानित करण्यात यिते 2025 या सालातील विदर्भातील नामवंत, कर्तुत्व संपन्न, गुणवंतांची निवड केलेली असून त्यांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.खालील प्रमाणे मान्यवरांना पुरस्कार देऊन 3 डिसेंबर 2025 रोजी कै. मधुकर धस यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून दिलासा संस्था घाटंजी जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हे पुरस्कार सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आयुष्यभर कार्य केले.अशा व्यक्तींना देण्यात येणार आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे.
जीवन गौरव पुरस्कार :- डॉ. मधुकर गुमळे, अमरावतीला.
विदर्भ रत्न पुरस्कार :- विजय कडू, यवतमाळ
मरणोत्तर पुरस्कार :- स्वर्गीय श्री डॉक्टर अविनाशजी शिर्के यवतमाळ
समाज कार्य गौरव पुरस्कार :-
दुधाराम उर्फ दिलीप बिसेन, – भंडारा
शितल सदाशिव ठाकरे येवतमाळ
पवन कुमार रामकिसन मिश्रा – वाशीम
माधुरी खडसे.- यवतमाळ
जिजा चांदेकर.- बुलढाणा
केशव तुळशीराम गुरनुळे
डॉक्टर कविता बोरकर – यवतमाळ
निरुपमा सुनील देशपांडे,- अमरावती
जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट.- वर्धा
या मान्यवरांना महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला,संघटक रमाकांत कुलकर्णी उपाध्यक्ष एम एन कोंडाळकर हे उपस्थित राहणार आहेत.
त्या सोबत विदर्भीय पुरस्कार संयोजन समिती,विजया धस, रंजीत बोबडे, बंडू आंबटकर संगीता गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचं आयोजन,संयोजन कोमल धस या करणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती संघटनेचे सचिव भूमिपुत्र वाघ यांनी केली आहे…
