You are currently viewing होळी जळते

होळी जळते

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा सुनंदा पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम गझल*

 

*होळी जळते*

 

*रंगपंचमी जवळी येता जखमेवरची खपली निघते*

*जुन्या नकोशा आठवणींची ह्रदयामध्ये होळी जळते*

 

भळभळणाऱ्या जीर्ण व्यथांची ऐकू येते विदीर्ण गाथा

रक्त सांडता कुणी बोलती नार नवेली रंग खेळते

 

त्यागासाठी नाव जानकी सदैव येते ओठावरती

जिच्या नशीबी चिरा न पणती सती उर्मिला कुणा न दिसते

 

कुशीत शिरतो सूर्य निशेच्या अंधाराचा पडदा पडतो

रविकिरणांच्या स्पर्शासाठी उषा पहाटे जागी असते

 

घर दोघांचे स्वप्नामधले रोज बघावे सायंकाळी

स्वप्न भंगता पुन्हा सकाळी नव्या व्यथांचे दार वाजते

 

*गझलनंदा*

प्रतिक्रिया व्यक्त करा