You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारात भाजपा कामगार मोर्चा सहभागी

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारात भाजपा कामगार मोर्चा सहभागी

*वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारात भाजपा कामगार मोर्चा सहभागी*

*वेंगुर्ले शहरातील कामगार कुटुंबीयांची भेट घेऊन भाजपा सरकारने कामगारांसाठी केलेल्या भरीव कार्याची माहीती देणार.*

*केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत चार कामगार संहीता तात्काळ लागु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे कामगार वर्गाकडून जाहीर आभार !!!*
*अशोक राणे , जिल्हा संयोजक , भाजपा कामगार मोर्चा*

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर आज भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोकजी राणे साहेब तसेच भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातील पदाधिकारी यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला अध्यक्ष श्री बाळू देसाई साहेब यांची भेट घेण्यात आली या वेळी अनेक विषयावर चर्चा करून होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपा सर्व उमेदवार यांना पूर्ण पाठिंबा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले, तसेच वेंगुर्ले शहरातील कामगारांची भेट घेऊन , भाजपा सरकारने कामगारांसाठी जे सकारात्मक निर्णय घेतले त्यांची माहीती दिली जाईल असे सांगीतल.
या वेळी सेवा शक्ती संघर्ष विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, वेंगुर्ला आगार सचिव श्री दाजी तळवणेकर, विभागीय उपाध्यक्ष श्री संजय सावंत, कणकवली आगार अध्यक्ष श्री मनोजकुमार पवार, श्री उदय मसुरकर , विजयदुर्ग आगार सचिव श्री रोहन शिंदे, वेंगुर्ला आगार उपाध्यक्ष श्री भाऊ सावळ, श्री अनंत झोरे, श्री प्रकाश मोहिते , प्रशांत खानोलकर , शरद मेस्त्री अन्य सभासद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा