You are currently viewing सावंतवाडीत शिवसेनेचा प्रचार वेगात; जनसंपर्कात केसरकर आघाडीवर
Oplus_16908288

सावंतवाडीत शिवसेनेचा प्रचार वेगात; जनसंपर्कात केसरकर आघाडीवर

कोपरा बैठका आणि थेट जनसंपर्कातून उमेदवारांना विजयाकडे नेण्याचा निर्धार

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून शिवसेनेचा प्रचार प्रत्येक प्रभागात जोरदार वेग घेत आहे. माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर हे स्वतः आघाडीवर उतरून शिवसेनेच्या उमेदवारांसाठी घरोघरी जनसंपर्क साधत आहेत. नागरीकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या पथकात नवीन जोश संचारला आहे.

सालईवाडा भागात झालेल्या बैठकीत आमदार केसरकर यांनी उमेदवारांचा प्रचार करीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून द्या, असा आवाहनाचा सूर छेडला. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अँड निता सावंत-कविटकर यांना नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याचवेळी पक्षाांतर्गत उमेदवार खेेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, पूजा आरावरी यांसह ज्येष्ठ नागरिक, विविध मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या विश्वासावर मोहर उमटवत पुन्हा एकदा शिवसेना सत्तेवर येण्याची शक्यता असल्याचे वातावरण बैठकीत दिसून आले.

शहरातील विविध कोपऱ्यात सुरू असलेल्या बैठका, प्रत्यक्ष संवाद आणि लक्षवेधी प्रचारामुळे सावंतवाडीतील निवडणूक आणखी चुरशीची बनली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा