*कै.सत्यविजय भिसे यांच्या समाजसेवेचा वसा भिसे कुटूंबिय आणि मित्रमंडळाने जपला-वैभव नाईक*
*शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २३ वा. स्मृतिदिन साजरा*
कुडाळ
कै. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर असणारे दानशूर नेतृत्व होते.गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले.दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत.परंतु त्यांचे कार्य त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत आपण पोहोचविले पाहिजेत.त्यांचे कार्य आपण पुढे सुरु ठेवले पाहिजे. सत्यविजय भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भिसे कुटुंबीय आणि सत्यविजय भिसे मित्रमंडळ राबवित असलेले सामाजिक उपक्रम देखील कौतुकास्पद आहेत. त्यांच्या समाजसेवेचा वसा भिसे कुटूंबियांनी आणि मित्रमंडळाने जपला आहे असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा आज २३ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी जि.प.सदस्य बाळा भिसे यांनी कै. सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहीली. सुशांत नाईक यांनीही भिसे यांच्या समाजकार्याप्रती आपले विचार व्यक्त केले.यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांचा शाल,श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच महिलांना साडी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सोमा घाडीगावकर, रंजन चिके,लऊ पवार,शिवडाव सरपंच नितीश भिसे, नितीन गावकर,उपसरपंच सायली तेली, संजय पारकर, चंदू शिरसाट, सत्यवान जाधव,उत्तम लोके, सुनील कुडतरकर,विश्वनाथ गवंडळकर,अण्णा नाचे,रवी सावंत,निकेतन भिसे,बाबू सावंत ,भाई कोदे, श्री. पाटकर सर,सुनील हरमलकर,संतोष मुरकर,सुनील राऊत,मधु चव्हाण, कळसुली ग्रा.पं. सदस्य नंदकिशोर परब,शैलेश दळवी, सत्यविजय परब,सत्यविजय जाधव,चंदू पवार,अनंत जाधव,नरेंद्र सदडेकर,संदीप शिरसाट, बाळा सावंत,अर्जुन गावकर,बंडू लाड,दीपक कोरगावकर,गणेश शिवडावकर, गणंजय तेली,रोहन म्हसकर, प्रथमेश काणेकर,महेश शिरसाट, कृष्णा चाळके,भाई चाळके आदींसह सत्यविजय भिसे प्रेमी व शिवडाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
