You are currently viewing मिठबावच्या अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थीचा पुनर्भेट मेळावा उत्साहात साजरा !

मिठबावच्या अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थीचा पुनर्भेट मेळावा उत्साहात साजरा !

देवगड :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव हे शिक्षिकाचे गाव म्हणून ओळखले जाते. याचं अध्यापक विद्यालयातून मोठ्या संख्येने शिक्षक होऊन गेले. ज्या विद्यालयात उपप्राचार्य स्व.मोहनराव चौगुले यांनी प्राथमिक शिक्षक पदविका अभ्यासक्रम संपादन करण्यासाठी आपलं योगदान दिले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी करवीरनगरी शैक्षणिक जीवनातील पुनर्भेट मेळावा गुरूमाऊली श्रीमती राधाबाई चौगुले यांच्या उपस्थितीत अलिकडे घेण्यात आला. प्रारंभी गुरूवर्य चौगुले सरांच्या प्रतिमेला माजी शिक्षक श्री. व्ही. जी.फाटक आणि मेळाव्याचे संयोजक प्रदिपकुमार सारंग यांच्या हस्ते गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर मेळाव्याची संकल्पना प्रदिपकुमार सारंग यांनी सूचित करताना यासाठी प्रकाश शेगुलवाडकर यांनी पुढाकार घेतला यामुळे याला मूर्तस्वरूप देता आले असे नमूद केले. यामागे पन्नास वर्षांनी आपण एकमेकांना भेटतोय ही संकल्पना त्यात होती. तसेच स्व.चौगुले सरांबरोबरच गुरूमाऊली श्रीमती राधाबाई चौगुले यांचा स्नेहसंबंध असल्याने करवीरनगरी निश्चित करण्यात आली. १९७६ते ७७ व १९७८ते १९७९ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करू शकलो. खरंतर आज उपस्थित असलेल्यापैकी बरेचजण सत्तरीचे वयोमानातील आहेत. म्हणूनचं या भेटीला सुवर्ण मेळावा म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे सहभागी शिक्षकवृंदानी संवाद साधत आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी शिक्षक श्री. व्ही. जी. फाटक, सौ. फाटक, गुरूमाऊली श्रीमती राधाबाई चौगुले यांचा शाल, श्रीफळ आणि भेट वस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थीप्रिय माजी शिक्षक श्री. व्ही. जी.फाटक यांनी आपल्या खास शैलीत कविता वाचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी माजी शिक्षक उदय मेहेंदळे, मनोहर कोयंडे, शालीनी गायकवाड बागवे, सुरेखा परब लोके यांनी गमतीजमती आठवणी जागवल्या. तर या रंगतदार मेळाव्याचे सूत्रसंचालन गोपाळकृष्ण तथा बाबा मुणगेकर यांनी अतिशय सुबक शब्दात केले. त्यानंतर कोल्हापूर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे पाहत गुरूमाऊली श्रीमती राधाबाई चौगुले यांचे आभार व्यक्त करून निरोप घेऊन सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा