*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा करंदीकर लिखित काव्याचे विगसा यांनी केलेले रसग्रहण*
*मनाच्या गवाक्षातून*
गवाक्षातून हिरवाईच्या उतरुन
आले आभाळ खालती
अनंत असंख्य ओहोळ प्रकाशाचे
सलील झाले धरेवरती
अद्वैताच्या पाऊलखुणा
दिशादिशात चिरतरुण
निष्राण गवतावर हसरे फूल
तुझ्या अस्तित्वाची देते खूण
चैतन्याचा झरा खळाळतो
मग सा-या चराचरातून
मूलाधारातील अग्नीफूल
तेजस्वी प्रदिप्त होते देहातून
प्रज्ञा करंदीकर
बंगळुरु
(फोटो सौजन्य सह्याद्री भटकंती करणारे पत्रकार श्री,मनोज कापडे)
〰️〰️〰️〰️
प्रिय भगिनी प्रज्ञा करंदीकर यांच्या मनाच्या गवाक्षातून
ओसंडलेले शब्द अनंताला कवेत घेवून निसर्गातील अद्वैताची साक्ष मनांतरात जागृत करतात…!
प्रज्ञाच्या लेखनात नेहमीच एक संस्कारांची आत्मिक संवेदना जाणवत असते. हे खरे वैशिष्ठ्य आहे. तिच्या लेखनातून वैश्विकतेच्या मूलाधाराचा प्रत्त्यय येतो हे मला जाणवते.
शब्दभावना आणि त्याला सजविणारी नैसर्गिक छबींची सुंदर झालर मनमोहक आहे…!!
*शब्दसंस्कारांच सात्विक कोंदण हे रचनेला मनाच्या काळजात खोलवर स्पर्श करतं तेंव्हा ती रचनाच देहातून गाभाऱ्यातील प्रसन्न फुलवाती सारखी प्रज्वलित होत आहे याची प्रचिती येते.*
*शुभंभवतु*
आप्पा
🔯🕉️🔯
