*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ सुलक्षा मदन देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निखळ आनंद*
चिव चिव करत
चिमणी आली
दाणे टिपून
उडून गेली
विठू विठू करत
पोपट आला
पेरू खाऊन
उडून गेला
काव काव करत
कावळा आला
पाहुण्यांची वर्दी
देऊन गेला
कुहू कुहू करत
कोकीळ आला
सुरेल गाणे
ऐकवून गेला
थुई थुई नाचत
मोर आला
पिसारा फुलवत
निघून गेला
अशी पक्षांची
वर्णी लागली
निखळ आनंद
देऊन गेली
✒️©®
*सौ सुलक्षा मदन देशपांडे*
