You are currently viewing “मी आहे ना”

“मी आहे ना”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*✨ “मी आहे ना” ✨*

 

आरशासमोर उभी ती

केसांत वारा खेळतो

नजरेला नजरेत देत

आरसा तिच्याशी बोलतो.

 

कशी दिसतेय मी आज

ती हळुवार आरशाला विचारते

आरसा म्हणतो तिला

तू तुझ्या रूपावर भाळते

 

ती बांगडीशी कुजबुजते

नको सारखं सारखं खनकत जाऊ

बांगडी वाजते हलकेच

थोडंसं हस गं नको उदास होवू

 

कानातले डुल म्हणतात

मनात गाणं धर गं

टिकली न्याहाळते तिला

प्रेम रंग तुझ्यात भर गं.

 

हार म्हणतो गळ्यातला

तुझ्यामुळे मी छान दिसतो

शृंगार तुझा पाहून

आरसा तुला छळतो

 

ती आरशाला म्हणते

तू आहेस म्हणूनचं मला बघते

आरसा म्हणतो शांतपणे

तू खरच छान दिसते

 

ती हसते गालावर फुलते

नवचैतन्याची खळी

आरशात स्वतःला न्याहळताना

मनात उमलते कळी

 

बट केसांची मागे घेऊन

ती मनोमनी गाते गाणी

आरशात पाहून म्हणते

मीच माझ्या रूपाची राणी

 

आरसा म्हणतो तिला

मी आहे ना रोज मला बघायचं

आनंदाला कवेत घेऊन

टिकली बांगडी सोबत हितगुज करायचं

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा