You are currently viewing श्री क्षेत्र अचलबेट येथे आज होणार राज्यस्तरीय पहिले अभंगवाणी साहित्य संमेलन.

श्री क्षेत्र अचलबेट येथे आज होणार राज्यस्तरीय पहिले अभंगवाणी साहित्य संमेलन.

धाराशिव :

पवित्र श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान तुरोरी- कराळी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी, *काव्यप्रेमी महाराष्ट्र* आयोजित राष्ट्रीय पातळीवरचे पहिले अभंगवाणी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती संयोजक, आयोजक भूमिपुत्र वाघ यांनी दिली.

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या संदर्भात विविध प्रकारची साहित्य संमेलने नियमित कोठे ना कोठे होत असताना,अभंगवाणी साहित्य संमेलन हे आगळं वेगळं आणि निश्चितच पुरोगामी विचाराला पुरस्कृत करणारे हे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन ठरणार आहे.या साहित्य संमेलनाकडे महाराष्ट्रातल्या विविध साहित्यिकांचे विशेष लक्ष लागलेले असून ते एक आकर्षण ठरणार आहे.हे साहित्य संमेलन 23 नोव्हेंबर2025 रोजी रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 3 वाजेपर्यंत होईल.महाराष्ट्रातील निमंत्रित कवीं/अभांगकार /कीर्तनकार यांना ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार. आहे.अभंगवाणी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून भूमिपुत्र वाघ यांचे धर्मगुरू विश्वनाथ( अण्णा) तोडकर अध्यक्ष महाराष्ट्र लोक विकास मंच, ह भ प श्रीहरी लवटे गुरुजी,ह. भ पं भीम महाराज,अनाथ गरिबांची माय विद्याताई वाघ, प्राचार्य वेंकट अणिगुंठे, प्राचार्य गोविंद बिराजदार या महान विभूती उद्घाटक म्हणून विशेष उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती संयोजक,विकास राठोड, लक्ष्मण पवार उमरगा,सुनंदा भगत नांदेड, सुधाकर झिंगाडे,कमलाकर भोसले, विकास गायकवाड,उमरगा यांनी दिली. महाराष्ट्रातील विशेष निवडक,गीतकार,अभंगकार,संत साहित्यिक हे सहभागी होणार आहेत.रसिकांनी साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजना समितीने केले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा