कुडाळ :
तहसील कार्यालय, सामाजिक न्याय विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महिला व बालरुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष यूडीआयडी तपासणी व मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल १७० दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा, प्रमाणपत्रांचा आणि आवश्यक सेवांचा लाभ घेतला. लाभार्थ्यांना यूडीआयडी कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्रे, नोंदणी प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देत लाभ वेळेत मिळावा यासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
यावेळी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरीश जाधव, महसूल नायब तहसीलदार संजय गावस, संजय गांधी सहाय्यक महसूल अधिकारी वैजयंती प्रभू, सहाय्यक महसूल अधिकारी सौ. गीता तांडेळ, महाआयटीचे जिल्हा प्रकल्प प्रमुख रुपेश कुणकवळेकर, आयटी असिस्टंट लक्ष्मीकांत परब, ग्राम महसूल अधिकारी श्री. केरकर, श्री. कांबळे, महसूल सेवक अमोल सुतार, सौ. तनुजा कुंभार, डॉक्टर, वैद्यकीय पथक व ऑपरेटर्स उपस्थित होते.
तसेच नेत्रचिकित्सक डॉ. जोशी, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. निखिल अवधूत, ईएनटी सर्जन डॉ. श्याम राणे, संगिता टिपरसे, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ रेश्मा भाईप, फिजिओथेरपिस्ट योगिता शिंदे, स्पीच थेरपिस्ट श्रीधर पोवार, विजय जाधव, प्राची सावंत आदी तज्ञ उपस्थित होते.
लायन्स क्लब कुडाळ तर्फे अध्यक्ष आनंद कर्पे, सचिव सागर तेली, खजिनदार जीवन बांदेकर, लायन सीएफ सुनील सौदागर, लायन श्रीनिवास नाईक, लायन डॉ. सुषांता कुलकर्णी, लायन मंजुनाथ फडके उपस्थित होते. रुग्ण आणि लाभार्थ्यांसाठी भोजन व पाण्याची व्यवस्था लायन्स क्लबने केली.
