वार्ड क्रमांक ६ मध्ये उदय भोसले यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
सावंतवाडी :
येथील नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) तर्फे वार्ड क्रमांक ६ मधून उमेदवारी मिळालेल्या उदय भोसले यांचा प्रचार वेग पकडत आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या धोरणामुळे भोसले यांना स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरातील वातावरण त्यांच्या समर्थनात रंगताना दिसत आहे.
उदय भोसले आपल्या सहकाऱ्यांसह सक्रीयपणे डोअर टू डोअर भेटीगाठी घेत असून विकासकामांची माहिती व भविष्यातील योजनांचा आढावा ते मतदारांना देत आहेत. नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता वार्ड ६ मधील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

