You are currently viewing वित्तीय क्षेत्रातील MS-Excel चा वापर यावर प्रशिक्षण

वित्तीय क्षेत्रातील MS-Excel चा वापर यावर प्रशिक्षण

*वित्तीय क्षेत्रातील MS-Excel चा वापर यावर प्रशिक्षण*

दि.२९ रोजी वैभववाडी महाविद्यालयात आयोजन

वैभववाडी

आजच्या संगणक आणि डिजिटल युगात
सहकारी कार्यालये, संस्था व बँकांमधील वित्तीय माहितीचे विश्लेषण या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
शासकीय, निमशासकीय सरकारी कार्यालये, संस्था व बँकांमधील वित्तीय माहितीचे विश्लेषण व अहवाल तयार करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी च्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC), संख्याशास्त्र व गणित विभाग, संयुक्त विद्यमाने व प्रधान मंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार प्रायोजित शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०. ०० वा. MS-Excel चा वापर करून सांख्यिकीय डेटा विश्लेषण : सहकारी संस्था व बँकांमधील वित्तीय अंतर्दृष्टी या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचा मूळ हेतू हा MS-Excel चा वापर करून सहकारी कार्यालये, संस्था व बँकांसाठी उपयुक्त वित्तीय माहितीचे विश्लेषण असा आहे व आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माहिती-आधारित निर्णय कार्यक्षमता, जोखीम मूल्यांकन व धोरण नियोजन सुधारणा करणे तसेच सहकारी कार्यालये , संस्था व बँकांच्या विशेष वित्तीय संरचना व अहवाल गरजा समजून घेणे आणि वित्तीय लेखापरीक्षण, सदस्य अहवाल व नियामक अनुपालनासाठी उपयुक्त अंतर्दृष्टी निर्माण करणे हा या कार्यक्रमयाचा उद्देश आहे. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये MS-Excel मधील मूलभूत व प्रगत तंत्रे तसेच बँकिंग, सहकारी संस्था व कार्यालये येथील माहितीचे विश्लेषण यावर व्याख्याते डॉ.सोमनाथ पवार -शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, श्री.रमेश लोणार-आर.बी.एल बँक, व प्रा.रणजित पाटील -आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रम प्रतिनिधी नोंदणी फी रुपये ३००/- (तीनशे रुपये) असून सहभागीना चहा-नाश्ता, जेवण व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामध्ये कार्यालयीन कर्मचारी, विकास संस्था, पतसंस्था, बँक कर्मचारी यांनी सहभागी व्हावे. नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी प्रा.सचिन भास्कर (९९ ६० ५४ ४२ २६) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा