You are currently viewing डामरे देव गांगो अनभवानी मातेचा आज शुक्रवारी  यात्रोत्सव

डामरे देव गांगो अनभवानी मातेचा आज शुक्रवारी  यात्रोत्सव

डामरे देव गांगो अनभवानी मातेचा आज शुक्रवारी  यात्रोत्सव

कणकवली :

डामरे येथील जागृत दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा वार्षिक यात्रोत्सव शुक्रवारी (दि. २१) होत आहे. या यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेदिवशी रात्री मानकरी देवी अनभवानीच्या उगमस्थानावरून पाचशेर पाणी वाजत गाजत मंदिरात आणतात. रात्री ११ वाजता ते पाणी कोहाळ्यात ओतून पेटविले जाते. रात्रभर हे पाणी पेटत असते. भाविकांना या शिवकालीन असणाऱ्या भवानी मातेचा अनुभव यायला लागला म्हणून तिला अनभवानी असे संबोधण्यात येऊ लागले. या यात्रेनिमित्त सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा

नाकाप्रयोग होणार आहे.

श्रद्धा स्थान असलेने मी सुद्धा हजर राहणार आणि नवस पूर्ण करणार असे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा