You are currently viewing इंदुरीकर महाराजांवर लोकांनी टीका का केली – ॲड रुपेश पाटील, ठाणे

इंदुरीकर महाराजांवर लोकांनी टीका का केली – ॲड रुपेश पाटील, ठाणे

ठाणे :

निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचे लग्न ठरले आणि काही दिवसांपूर्वी तिचा थाटामाटात साखरपुडा संपन्न झाला. त्यावेळी महाराष्ट्राच्या सुजान जनतेने इंदुरीकर महाराजांना सोशल मीडियावर ट्रोल केले. काही तरुणांनी इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवरही ट्रोल केले. ते सर्व पाहून या महाराजांचे मन दुखावले. मग त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना लोकांना सांगितले, हवं तर मला तुम्ही काहीही बोला पण माझ्या मुलीवर टिप्पणी करू नका! परंतु तरीही लोकांनी इंदुरीकर महाराजांना सोडले नाही. कारण इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून सतत सांगायचे कर्ज काढून आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करू नका जरी पैसे तुमच्याकडे असले तरी देखील थाटामाटात मुलींचे लग्न करू नका ते पैसे त्यांच्या पुढील जीवनासाठी उपयोगी पडतील असे काहीतरी करा! हे आपले वचन सिद्ध न करता

इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा

थाटामाटात करून लोकांची टिका ओढवून घेतली. हे सर्व झाल्यावर इंदुरीकर महाराज म्हणतात. मला काहीही बोला माझ्या मुलीला बोलू नका! हे त्यांचे लोकांना सांगणे योग्य नाही. कारण महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत म्हटले जाते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या उक्तीप्रमाणे इंदुरीकर महाराज वागले नाहीत म्हणून ते आज टीकेचे धनी होत आहेत.

 

माझ्या मुलीला बोलू नका हवं तर मला बोला! असं म्हणताना इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले. मी आता किर्तनसेवा बंद करणार आहे. इंदुरीकर महाराजांनी खरोखर आपली कीर्तनसेवा बंद करावी. कारण त्यांच्या कीर्तनात ८० टक्के केवळ मनोरंजन होते आणि २० टक्के प्रबोधनाचा भाग होता. त्यांच्या कीर्तनात कायम कॉमेडी व अंगविक्षेप होते. भक्ती संप्रदायाला न शोभणारे त्यांचे हे कीर्तन होते. या कीर्तनात त्यांनी महिला, मुलींवर नाही नाही त्या शब्दात कॉमेडी करून टीका टिपणी केली. आज ५० टक्के समाज विचित्र स्वभावाने वागतो. कोणतेही नीती मूल्य हा समाज पाळत नाही. यामध्ये पुरुष व महिलांचे प्रमाण समसमान आहे पण इंदुरीकर महाराज मनोरंजनात्मक प्रबोधन करताना महिला, मुलींवर जास्त घसरायचे. यात ते महिलांवर नको त्या शब्दात टीका करायचे. कीर्तनकारांनी पुरुष, महिलांवर टीका केली पाहिजे अशी टीका केल्याशिवाय समाज सुधारणार नाही पण सुशिक्षित, सुज्ञ जनतेला विचित्र वाटेल अशा शब्दात इंदुरीकर महाराज सर्वांवर बोलायचे त्यात महिला हा त्यांचा आवडता विषय होता. त्यामुळे महिला त्यांच्या वक्तव्याने कायम दुखावत जायच्या पण इंदुरीकर महाराजांवर वारकरी संप्रदाय काही बोलत नव्हता त्यामुळे महिला मुग गिळून गप होत्या परंतु ट्रोल प्रकरण बाहेर आल्यावर महिला इंदुरीकर महाराजांवर खुलेआम टीका करू लागल्या आहेत.

अशावेळी महाराष्ट्राची पूर्ण जनता इंदुरीकरांच्या मुलीवर टीका करणारच

 

इंदुरीकर महाराजांनी महिला, मुलींच्या कपड्यांवर, त्यांच्या केसातील भांगावर कपडे घालण्याच्या पद्धतीवर जोरदार टीका करायचे. त्या तिकेतून इंदुरीकर महाराजांनी नैतिकतेचे वस्त्रहरण चालवले. म्हणून आज त्यांच्या मुलीवर सर्व स्तरातून टीका होत आहेत. तशीच टीका इंदुरीकर महाराजांवरही होत आहे. याचमुळे इंदुरीकर महाराजांनी आपली कीर्तनसेवा बंद करून स्टँड अप कॉमेडीत येऊन काम करावे. म्हणजे त्यांना आपले समाजकार्य साधता येईल. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदत करता येईल. त्यांची शाळा चालवता येईल. लोक आज कॉमेडी कार्यक्रम जास्त बघतात, हल्ली कॉमेडी नाटके जोरदार चालतात त्यामुळे इंदुरीकर महाराजांची स्टँड अप कॉमेडी खूप लोकप्रिय होईल. इंदुरीकर महाराजांवर दुर्दैवाने आपल्याला असे बोलावे लागते. कारण इंदुरीकर महाराजांनी कायम समाजावर आपले वायफळ विचार माथी मारले. थाटामाटात लग्न नाही केले तरी पोरं बाळ होतात किंवा हिंदू धर्मशास्त्रात फक्त मुलं होण्यासाठी काळ वेळ व मंत्र आहेत. त्याचबरोबर महिला कीर्तनकार पेठे बांधतात मग मी गाऊन घालायचा का? असे नको नको ते विचार त्यांनी आपल्या कीर्तनातून मांडले.

 

कीर्तनकार हा लोकशिक्षक असतो. त्याने संत परंपरेतील अभंग सांगून त्याचा भावार्थ, मतीतार्थ अध्यात्मिक व वैज्ञानिक अर्थ सांगावे. त्याकरता त्याने विविध प्रकारची उदाहरणे लोकांसमोर ठेवावी. आपण कुटुंबात ज्याप्रकारे विनोदात गोष्टी स्पष्ट करून सांगतो त्याचप्रमाणे कीर्तनकाराने समाजाचे पालकत्व घेऊन लोकांचे प्रबोधन करावे परंतु असे प्रबोधन करताना विषय बाजूला ठेवून वायफळ विनोद विचित्र हातवारे करू नयेत. हा संपूर्ण महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचा शिष्टाचार आहे. तो इंदुरीकर महाराज अजिबात पाळत नव्हते. त्यांनी गायलेले अभंग लोकांना नीट समजून येत नव्हते.

ते एका एका ओळीचा अर्थ सांगताना वायफळ गप्पा फार मारायचे. त्यामुळे कीर्तन मारुतीच्या शेपटासारखे वाढायचे. किर्तन हे मोजक्या विषयांनी भरलेले असावे आपल्या अभंगात संत काय सांगतात या गोष्टीवर जास्तीत जास्त भर असतो. नामजप, अभंग, भजन, मग अभंगाचा सरळ अर्थ, त्याचा भावार्थ, मतीतार्थ, वैज्ञानिक अर्थ हे सर्व सांगत असताना ती उदाहरणे संतांच्या विचारांची असावी. रामायण, महाभारत, भागवत, गीता, मनाचे श्लोक, दासबोध, गाथा या सर्व ग्रंथांमधला आढावा घेत, उदाहरणे देत कीर्तन पूर्ण करायचे असते. मग राम कृष्ण हरी चे गायन करून किंवा एखादी गवळण गाऊन लोकांना आपल्या कीर्तनात शेवटी तल्लीन करायचे असते.

 

या सर्व गोष्टींना इंदुरीकर महाराज फाटा देत होते. नामजपाच्या नावाखाली व्यासपीठावर गोंधळ घालायचे, अभंग सांगताना वेगात सांगायचे, नंतर भजन करताना उड्या मारून व्यासपीठाचा अपमान करायचे, त्यानंतर ते अभंगाचा भावार्थ सांगत नको ती उदाहरणे देत भावार्थ उगीच वाढवायचे. हे करताना नको असलेले हात वारे करून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करायचे किर्तन हा प्रकार प्रबोधनाचा आहे तमाशाचा नाही. हे सर्व विसरून इंदुरीकर महाराज लोकांच्या मनात घर करायला बघायचे पण आता मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराजांना लोकांची भावना समजून आली आहे. म्हणून इंदुरीकर महाराज म्हणत आहेत आता मी किर्तनसेवा बंद करतो. हे त्यांचे विधान तत्वाला धरून आहे. कारण लोकांनी आज 22 वर्षानंतर इंदुरीकर महाराजांना नाकारले आहे. याची जाणीव खऱ्या अर्थाने इंदुरीकर महाराजांना झाली आहे म्हणून ते आपल्या कार्याला पूर्णविराम देत आहेत.

 

ॲड.रुपेश पवार, ठाणे

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा