*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*प्रभास पुरस्काराच्या निमित्ताने*
पुरस्कार म्हणजे केलेल्या कामाची पावती, ज्यामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते उत्साह वाढतो,
पुरस्कारार्थ मिळालेले सन्मानपत्र, ट्रॉफी कालांतराने खराब होईल , पण त्यामुळे उत्साह आणखी चांगले करण्याची प्रेरणा मिळते,
पुरस्कारामुळे मनाला आनंद होतो, ओठावर हसू येते
मी सुद्धा काही चांगलं काम करू शकतो ही उमेद मिळते! आठवतंय ना,लहानपणी
आईने दिलेली शाबासकी किती महत्वाची वाटायची आपल्याला! आईची कौतुकाची नजर हा तर सर्वश्रेष्ठ पुरस्कार असायचा आणि तिने आपले कौतुक करावे म्हणून आणखी प्रयत्न करायचा तिनेदिलेले
एखादे चॉकलेट सुद्धाकिती महत्वाचे! क्षुल्लक वाटणाऱ्या ह्या गोष्टी! जीवनात बदल घडवितात हे मात्र खरे!
प्रत्येकाला आपले कौतुक हवे असतेच असते कुणीतरी आपल्या चांगल्या कामाची दखल घेतली ह्याचा आनंद सर्वश्रेष्ठ!कौतुक हे पुरस्काराचेच स्वरूप आहे ,जे आनंद देणारे आहेजीवनाचे
टॉनिक आहे! कौतुक म्हणजे प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पुरस्कार!
समाजात ह्याचे स्वरूप बदलते! त्याला थोडे औपचारिकतेचे स्वरूप येते एव्हढेच!
पुरोगामी विचारांचे दैनिक हिंदुस्थान चालविणारी मराठे मंडळी सामाजिक बांधिलकी जपणारी! चांगल्या कामांना , लिहित्या हातांना प्रोत्साहन देणारी ,प्रत्येकाचे विचार स्वातंत्र्य इथे जपले जाते! इथे छोट्या छोट्या गोष्टींचे दिलखुलास कौतुक
,अभिनंदन केले जाते !ह्याच विचारातून मागील तीन वर्षांपासून दै हिंदुस्थानचा प्रभास पुरस्कार आता आम्हा वाचकांच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे! ह्या पुरस्काराचे उल्लेखनीय वैशिष्ट्य असे की निवड समितीत एकही मराठे सदस्य नाही समितीच्या कार्यात दखल घेतली जात नाही। सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख २५००० रुपये असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे दै हिंदुस्थानच्या आधारवड , आदरणीय प्रभाताई अरुण मराठे ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिल्या वर्षी हा पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील सेवा संकल्प प्रतिष्ठान, पळसखेड,
चे संचालक सौ आरती व डॉ नंदकुमार पालवे ह्यांना देण्यात आला, तर दुसरा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील मालधुर येथील समर्पण प्रतिष्ठानला देण्यात आला! ह्यावर्षी तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी आहेत यवतमाळ येथील नंद दीप फाऊंडेशनचे संस्थापक श्री संदीपजी शिंदे!
त्यांनी आपले जीवन मनोरुग्ण सेवेला समर्पित केलेले आहे अतिशय नम्र, कष्ट करण्याची जिद्द व आपण समाजाला काही देणे लागतो ही भावना! संदीपजी! आपल्या नावातच अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे सामर्थ्य आहे
अमरावतीत स्वागत आहे अभिनंदन आणि शुभेच्छा
प्रभास पुरस्कार जाहीर
करतांना व्यक्तीपेक्षा कृतीला महत्व दिलेले आहे ही बाब लक्ष्यात घेण्यासारखी आहे!
समाजात चांगली कामे करणाऱ्या मंडळींना पुरस्कृत करून अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या मराठे कुटुंबाचे मनापासून कौतुक वाटते! कुठल्याही पक्षाला पाठींबा न देता प्रत्येक पक्षातील चांगल्या कामाची दखल घेणारे हे वृत्तपत्र आमच्या अभिमानाचा विषय आहे
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
