सावंतवाडी :
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांनी शहरात घेतलेल्या प्रचारअभियानाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, त्यांचे प्रचारफेरीदरम्यान जोरदार स्वागत केले जात आहे. कोणतीही टीका किंवा विरोध झाला तरी श्रद्धा भोसलेच नगराध्यक्षपदी विराजमान होतील, असा विश्वास मोठ्या संख्येने मतदार व्यक्त करताना दिसत आहेत.
भाजपच्या माध्यमातून त्यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात त्यांच्या प्रचाराची गती अधिक वाढली आहे. घराघरांत पोहोचत महिलांशी संवाद साधताना भोसले यांना मिळणारा पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. मतदान दिनाच्या पूर्वतयारीतही महिलांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत असून, “आम्ही राजघराण्याच्या पाठीशी आहोत” असा ठाम विश्वास महिला वर्गातून व्यक्त होत आहे.
प्रचाराच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा भोसले त्या-त्या प्रभागांमध्ये सहकाऱ्यांसह भेटीदरम्यान जनतेशी थेट संवाद साधत आहेत. त्यामुळे विजय निश्चित असल्याचा दावा भोसले समर्थकांकडून करण्यात येत आहे.
