सागर वालावलकर यांच्या नेतृत्वाला तरुणांचा प्रतिसाद; गौरव राऊळ यांची युवासेना तालुका संघटकपदी नियुक्ती
कुडाळ :
तेंडोली गावातील उबाठा सेनेचे तब्बल ३५ उत्साही युवक तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झाले. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा धक्का महत्त्वाचा मानला जात आहे.
नव्या प्रवेशकांमध्ये गौरव प्रमोद राऊळ, पंकज प्रमोद राऊळ, प्रथमेश गुरुनाथ राऊळ, दशरथ गणपत राऊळ, गुरुनाथ सहदेव राऊळ, महेश अर्जुन वालावलकर, अक्षय अनंत वारा, सिद्धार्थ दीपक राऊळ, पंकज भारत धारपावर, अमृत गणेश सर्वेकर, सखाराम आत्माराम राऊळ, विनायक यशवंत राऊळ, संतोष मधुकर राऊळ, विनायक रघुनाथ राऊळ, विराट विलास खानोलकर, समीर कृष्णा राऊळ, गंगाराम राधाकृष्ण राऊळ, दीपक राऊळ आदी युवकांचा समावेश होता.
या सर्वांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रवृत्तीने प्रेरित होऊन शिवसेनेत विश्वासाने प्रवेश केला. समारंभात आमदार राणे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे गौरव राऊळ यांची युवासेना कुडाळ तालुक्यातील संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
