लोरे गावात धडाका – सिंधुदुर्ग मायनिंग अँड मिनरल्सचा अनधिकृत माती व सिलिका लूट उघड!
खनिकर्म विभागाचे अधिकारी थक्क – कंपनीला जागेवरच झोंबता सवाल!
लोरे गावात खळबळ माजवणारा प्रकार उघड झाला आहे.
लोरे
सिंधुदुर्ग मायनिंग अँड मिनरल्स (मुख्य संचालक जीवन तुळशीदासराव राणे) यांनी जिल्हा स्तरावर कोणतीही मंजुरी न घेता मोठ्या प्रमाणात माती व सिलिका उत्खनन सुरू ठेवल्याचे आज खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर उघड झाले.
ग्रामस्थांनी पथकाला स्थळावर नेल्यावर दिसलेले दृश्य हादरवणारे—
⛔ खोल खड्डे, प्रचंड प्रमाणात काढलेला सिलिका साठा,
⛔ परिसरात पसरणारे मातीचे डोंगर,
आणि कुठेही कायदेशीर परवानगीचा मागमूसही नाही!
अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना थेट विचारले:
👉 “जिल्हा स्तरावरची कोणतीही अनुमती नसताना हे उत्खनन कसं काय सुरू केलं?”
ग्रामस्थांचा संताप ओसंडून वाहत होता.
घरे धोक्यात, पाण्याचे झरे धोक्यात, शेतीची जमीन धोक्यात…
आणि कंपनीच्या मनमानीने संपूर्ण परिसर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर!
अखेर अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले:
⚠️ “या अनधिकृत माती व सिलिका उत्खननावर योग्य कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल.”
