You are currently viewing वेंगुर्ल्यात शिवसेनेची ताकद: २१ उमेदवारांची घोषणा — शहराच्या विकासासाठी मत मागणी
Oplus_16908288

वेंगुर्ल्यात शिवसेनेची ताकद: २१ उमेदवारांची घोषणा — शहराच्या विकासासाठी मत मागणी

वेंगुर्ले :

राज्यात महायुतीचे सरकार असून जनतेच्या हितासाठी सर्वजण एकदिलाने काम करत आहेत. त्यामुळे भाजप किंवा राष्ट्रवादी असलेल्या सहकाऱ्यांवर शिवसेना कोणत्याही प्रकारची टीका करणार नाही, तर वेंगुर्ले शहराच्या विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

नगरपरिषद निवडणुकीत ‘विकासाला मत करा’ हा आमचा अजेंडा असल्याचे सांगत त्यांनी उमेदवारांची अधिकृत २१ नावे जाहीर केली. नगराध्यक्ष पदासाठी नागेश उर्फ पिंटू गावडे तर नगरसेवक पदासाठी लिना म्हापणकर, आदित्य प्रभूखानोलकर, तृप्ती माणगावकर, सुरेंद्र चव्हाण, सुचित्रा परब, उमेध आरोळकर, आरती वालावलकर, बुधाजी येरेम, सान्वी गावडे, सुनील डुबळे, रोहिणी लोणे, शंकर गावडे, राशी कुबल, बालकृष्ण हुळे, चित्रांजली केरकर, दत्ताराम नावेंकर, श्रद्धा बाविकर, विलास जाधव, मंजिरी मोरे, प्रसाद बाविकर आदींचा समावेश आहे.

वालावलकर म्हणाले की, गेल्या चार–पाच वर्षांत आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. गांजळेली पाईपलाईन बदलणे, नारायण तलाव प्रकल्प मार्गी लावणे, जलप्रकल्पासाठी ७० लाखांची मंजुरी, दुसऱ्या टप्प्यासाठी दीड कोटींचा निधी आणणे, बंदरातील जे्टीचे काम, पाणबुडी प्रकल्पाची सुरुवात, गवळीवाडा घरांचा प्रश्न सोडवणे अशा अनेक प्रलंबित कामांना गती देण्यात आली.

शहरातील रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांची कामे उभी राहू दिली नाहीत. वेंगुर्ल्यातील नागरिकांनी हे काम प्रत्यक्ष पाहिले आहे, असे ते म्हणाले.

नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना स्टार प्रचारक म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर व जिल्हा प्रमुख संजू परब प्रचारासाठी येणार असून, शहरातील विकासकामांची माहिती ते मतदारांपर्यंत पोहोचवतील, असेही वालावलकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा