You are currently viewing ” क्रांतिकारकांची शौर्यगाथा स्फुरणदायी” — सुभाष चव्हाण

” क्रांतिकारकांची शौर्यगाथा स्फुरणदायी” — सुभाष चव्हाण

” क्रांतिकारकांची शौर्यगाथा स्फुरणदायी” — सुभाष चव्हाण

थेरगाव –

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय गणेश नगर, थेरगाव येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या “हुतात्म्यांची वीरगाथा कथन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून “क्रांतिकारकांचा आत्मयज्ञ” लेखन करणारे सुभाष चव्हाण होते. अध्यक्षस्थानी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक होते.
प्रतिमा पूजन करून अन् ‘वंदे मातरम् ‘ घोष करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रमुख पाहुणे सुभाष चव्हाण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले..
” देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा धगधगता इतिहास शालेय विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे. क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे, बिरसा मुंडा, उमाजी नाईक, चापेकर बंधू , लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव , मदनलाल धिंग्रा, हुतात्मा बाबू गेणू , विष्णू पिंगळे यारख्या अनेक क्रांतीकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण केले .त्यांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा सतत देत राहील यासाठी विद्यार्थ्यांनी क्रांतीच्या इतिहासाची पुस्तके वाचली पाहिजेत. देशासाठी शहीद होणाऱ्या क्रांतिकारकांचे नित्य स्मरण विद्यार्थी मित्रांना जगण्याची नवी प्रेरणा, ऊर्जा देईल.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश कंक यावेळी म्हणाले… ” माझ्या देशावर माझे प्रेम आहे.” हे विद्यार्थी मित्रांनी स्वयंशिस्त, प्रखर देशाभिमान, माणुसकी, निस्वार्थ भावना, ईश्वर भक्ती, मातृ-पितृ भक्ती यातून दाखवून दिले पाहिजे. नवे परिवर्तनवादी विचार, नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे.! ”
क्रांतिकारक चापेकर बंधू , राणी लक्ष्मीबाई, वंदन क्रांतिकारका! या कविता विद्यार्थ्यांसाठी कंक यांनी गाऊन सादर केल्या.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी केले.
कार्यक्रमाच्या नियोजनात अश्विनी दळवी, योगेश्वरी जाधव, दीप्ती बंदपट्टे,शाम मस्तूद, मनीषा वाघ, रंजना कांबळे, शिवाजी पोळ, नलिनी पंडित यांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन सुनीता घोडे यांनी केले तर आभार अंजली सुमंत यांनी मानले.
वार्तांकन – सुरेश कंक
७५२२९०२७२७

प्रतिक्रिया व्यक्त करा