You are currently viewing वेंगुर्ल्यात आज पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी संवाद

वेंगुर्ल्यात आज पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी संवाद

वेंगुर्ले :

मत्स्य व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आज वेंगुर्ले शहरात नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप ऊर्फ राजन गिरप तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी ते शहरात आगमन करणार आहेत.

आज संध्याकाळी शहरातील ५ ठिकाणी ते मतदारांशी संवाद साधणार असून, सायंकाळी ४ वाजता प्रभाग २ मधील पिंटू सावंत यांच्या घरी, सायंकाळी ४.४५ वाजता प्रभाग ७ मधील राजवाडा येथील किरण कुबल यांच्या घरी, सायं. ५.३० वाजता प्रभाग ६ मधील गिरवाडा येथे सदानंद गिरप यांच्या घरी, सायं. ६.१५ वाजता प्रभाग ८ मधील आराधना कॉम्प्लेक्स येथे आणि सायं. ७ वाजता प्रभाग ३ मधील गौरी मराठे यांच्या घरी ते संवाद साधणार आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा