*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पुरुष दिन*
थकून गेलो
वाहून बोजे
परंपरेचे
जुनाट ओझे
गळलो खूप
दमलो आता
मारून साऱ्या
फसव्या बाता
नको वाटते
चिकटलेले
विशेषणांचे
मुकुट जुने
सांभाळताना
सर्यांना मग
फाटून गेली
पुरुषी मने
ताकदवान
हिम्मतवाला
पहाडी छाती
रक्षणवाला
आम्हाला आता
साधेच गणा
सर्वत्र फक्त
माणूस म्हणा
सारे समान
ना कोणी हीन
करू साजरा
पुरुष दिन
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
