You are currently viewing निळे लाघव

निळे लाघव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निळे लाघव*

 

निळ्या डोळ्यात हसू बोलके, हलके होई मन

तुझे नाव हळूच घेताना थांबून जाई क्षण

 

दिवसभरच्या गोंधळातून दमते थकलेली आस

तुझ्या शांत आवाजामध्ये सापडतो हळुवार श्वास

 

थकलेल्या या पावलांना जेव्हा दिसत नाही वाट

तुझ्या साध्या साथीनं मात्र उजळतो दुस्तर‌ घाट

 

घरातल्या काळजी तणावांनी होते कधी अस्थिर

तुझ्या घट्ट विश्वासामधून मिळतो मला आधार

 

तुझ्या नजरेतील निळे लाघव देते मनाला प्रकाश

थकल्या माझ्या जीवाला मिळे तुझ्यामुळे अवकाश‌

 

निवळते सगळी धावपळ, मन मागते शांतता

तुझ्या समीप येण्याने लाभे श्रांत जीवास निवांतता

 

©️®️ डॉ सौ. मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा