शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षक व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ…
कुडाळ प्रतिनिधी:-
शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षक व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला. कोविड19 च्या या रोगाने आपल्या देशाला त्रासलेले असताना सर्व शिक्षकानी महत्वाची भूमिका बजावली. धोकादायक परिस्थितितही आपली जीवाची पर्वा न करता समाजासाठी जी भूमिका पार पाडली ही खरोखरच उललेखनीयच आहे. त्यासाठी शिक्षकांचा कोविड योद्धा म्हणून गौरवपत्र पत्र व भेटवस्तू देऊन मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. रणजीत देसाई यांच्या हस्ते गौरविन्यात आले. त्याचप्रमाणे 10वी व 12वी मधिल गुणवन्त विद्यार्थांचाही सत्कारही यावेळी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रम पिंगुळी महापुरुष मंदिर येथे पार पडला. सदर कार्यक्रमास उपस्थित शिक्षक, विद्यार्थी वर्ग ग्रामस्त यानी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल देसाई साहेबांचे आभार मानले. यावेळी सदर कार्यक्रम पिंगुळी गावातील प्रत्येक वार्ड मधे जाऊन तेथील कोविड योध्यापर्यंत पोचन्याचा आपलां मानस आहे आणि त्याची सुरवात ही वार्ड नंबर 1 मधिल भूपकर वाड़ी येथून केल्याचे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास ग्रामपंच्यायत सदस्या सौ. प्रिया पांचाळ, माजी सरपंच ,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष श्री. राजन पांचाळ, पिंगुळी शहर प्रमुख व माजी उपसरपंच श्री.अजय आकेरकर, शेखर पिंगुळकर, मंगेश चव्हाण, सतिश माडये, चंद्रकांत मुंडये तसेच ग्रामस्त उपस्थित होते.