जिल्ह्यातील युवक युवतींना इस्त्राईल देशात रोजगाराची संधी
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्त्राईल देशात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास विभागाने दिली आहे. जिल्हृयातील जास्तीत जास्त युवक- युवतींनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देवून या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.
यामध्ये पुढीलप्रमाणे रिक्तपदे Plastering Work-1 हजार जागा, 2. Ceramic Tiling -1 हजार जागा, Drywall Worker- 300 जागा, Mason-300 जागा या पदांसाठी उमेदवाराची शैक्षणिक अहर्ता किमान 10 वी पास आहे. इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 25 ते 50 वर्षे वयोगटाचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी Renovation Construction या क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम दिला जाईल. या पदासाठी मासिक वेतन रु. 1 लाख 62 हाजर 500 पर्यंत असेल. इस्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच होणार आहे. नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हीजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे. इस्राईलमध्ये राहण्याची व जेवणाची सोय, मेडीकल विमा, इतर मेडीकल सुविधा दिल्या जाणार आहेत.
LinkofGoogleForm: ttps://docs.google.com/forms/d/1yl7iJQeMk1bZYbMrLtleyBRLQr8TBcY EGRXcEJIVPI/edit
