*स्व.गंगाराम गवाणकर यांची लाभली आहे काव्यसंग्रहाला प्रस्तावना*
मुंबई/ विरार :
युवा कवयित्री श्रुती रसाळ यांच्या ‘पापणीच्या पंखाखाली’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता जुने विवा कॉलेज सेमिनार हॉल, विरार (प.) येथे होणार आहे. ज्येष्ठ लेखक व नाटककार स्व. गंगाराम गवाणकर यांनी या कवितासंग्रहाला अखेरची प्रस्तावना दिली आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. गणेश नायडू (लोकशाही मराठी न्यूज चॅनेल संचालक), मा.श्री. प्रदीप विजया राधाकृष्ण कबरे (अभिनेता, लेखक, निर्माता, दिग्दर्शक) आणि मा.डॉ. गणेश चंदनशिवे (मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी विभाग प्रमुख) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे समन्वयक नगरसेविका सुरेखा कुरकुरे आणि संघटन संचालक आजीव पाटील हे आहेत.
या काव्यसंग्रहातून साहित्य विश्वात नव्या पुस्तकाचे आगमन होणार असून प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पापणीच्या पंखाखाली हा प्रेम कवितांचा मुक्तछंदातील कवितासंग्रह असून त्याला ज्येष्ठ नाटककार स्वर्गीय श्री गंगाराम गव्हाणकर यांची अखेरची प्रस्तावना लाभली आहे.
श्रुती रसाळ यांच्या कविता उत्कट व भावस्पर्शी आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन युवा कवियत्री श्रुती रसाळ यांनी केले आहे साहित्य प्रेमींनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हा कवितासंग्रह साहित्य विश्वात वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.यंग स्टार ट्रस्ट विरार अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या साहित्य चावडीच्या ७५ व्या पुष्पात हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
