प्रभाग १ मध्ये दिपाली भालेकर व राजू बेग यांच्या प्रचाराला शुभारंभ
सावंतवाडी
भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार सौ. दिपाली भालेकर आणि राजू बेग यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ आज भटवाडी येथील दत्त मंदिर आणि विठ्ठल मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. हा शुभारंभ युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते पार पडला.
याप्रसंगी उमेदवार सौ. दिपाली भालेकर, राजू बेग, माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, बुथ अध्यक्ष रवींद्र नाईक, प्रमोद भागवत, बाबी गवस, परशुराम गावडे, राजू सुभेदार, प्रसाद कशाळीकर, गुंडू कदम, नीलम जोशी, पूजा कशाळीकर, बंडया केरकर, रफिक जामदार, झेबा जामदार, स्नेहल जाधव, गीता रेगर, देऊ गावडे, शितल मिस्त्री, श्री गावडे, प्रदीप भालेकर, संतोष खंदारे, नंदू अळवणी, शशिकला अळवणी, देठे सर, पवार सर, निकिता पेडणेकर, सुजाता कोदे, समीक्षा खोचरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ. भालेकर म्हणाल्या, “भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र होऊन माझ्या प्रभागातील प्रलंबित कामे आणि समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”
