You are currently viewing मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात पार पडला विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि कॉर्पोरेट जगतासाठी तयारी करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम.

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात पार पडला विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि कॉर्पोरेट जगतासाठी तयारी करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम.

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात पार पडला विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि कॉर्पोरेट जगतासाठी तयारी करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम.

चिपळूण, मांडकी -पालवण ,दिनांक 18 नोव्हेंबर 2025,

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय ,मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि कॉर्पोरेट जगतासाठी तयारी करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी” मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वीणा अमोल थोरात उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवहारी कौशल्य व कॉर्पोरेट जगतासाठी तयारी करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याची जाण व्हावी, कृषी क्षेत्रात शिक्षण घेत असताना नोकरी, व्यवसाय, स्पर्धा-परीक्षा या सर्वांचीच माहिती विस्तृतपणे सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी आपले स्वतःची कमतरता आणि ताकद ओळखून भविष्यात वाटचाल करावी, हे देखील आवर्जून सांगितले. नवीन येणारे तंत्रज्ञान आपण आत्मसात करण्यासाठी तंत्रज्ञान आणि कृषीची सांगड घालून व्यवसायात उतरावे, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती कशा पद्धतीने कार्य करता येईल याचा देखील सल्ला दिला.
या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम ,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शमिका चोरगे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे कु. शितल डोहळे व आभार प्रदर्शन हे कु. प्रेम जाधव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा