*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवीची ….दंतकथा …!!*
शिणलेल्या अक्षरांच्या वेदना
तो ..भूल देवून थांबवायचा
मलमपट्टीच्या बहाण्याने.. तो
जखमांना शब्दांत जिरवायचा..!
कवितेची… श्रीमंती
त्याने जवळून बघितली
पण खपाटलेली पोटं
त्याला भरता नाही आली …!
उघड्या अक्षरांवर त्याने
सदा रेशमी वस्त्र पांघरले
पण स्वतः च शरीर झाकायला
फाटके कपडेच वापरले..!
राजवस्त्र.. परिधान करावं
इतका तो मोठा कवी होता
मैफीली कुणाच्या कां असेना
सर्वात उठून तो दिसत होता..!
स्वतःच नांव पाठीमागे न ठेवता
तो जगातून निघून गेला
असामान्य काव्याचा धनी
वेदनेतच शेवटी मेला…!
आजही त्याचा आत्मा वस्तीला माझ्या पुढ्यात येऊन बसतो सजवतो आमची अधुरी मैफील
अन एक दंतकथा होवून जातो..!
“”आभार तुझे!माझ्या आयुष्यात तू आलास…!तुझ्या प्रतिभेचा थोडासा भाग मला देऊन गेलास… थांबायचं होत यार!जरा घाईघाईतचं कवितेला सोडून गेलास….!!””
यार..जायची..घाई केलीस..
बाबा ठाकूर

