You are currently viewing समीर नलावडे यांच्यावरील आक्षेप फेटाळला

समीर नलावडे यांच्यावरील आक्षेप फेटाळला

समीर नलावडे यांच्यावरील आक्षेप फेटाळला;

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी कायम

कणकवली

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या भाजप उमेदवार समीर नलावडे यांच्या उमेदवारीवर घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. शहर आघाडीचे व क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांनी नलावडे हे एका गुन्ह्यात दोषी ठरल्याने निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचा दावा करत objection दाखल केला होता.

आज झालेल्या अर्ज छाननी दरम्यान ही हरकत सुनावणीस आली. पारकर यांचा दावा असा होता की, जिल्हा सत्र न्यायालयाने नलावडे यांना एका गुन्ह्यात शिक्षा सुनावल्याने त्यांची उमेदवारी ग्राह्य धरता येणार नाही. मात्र नलावडे यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयातील संबंधित निर्णयपत्रे सादर करत, जिल्हा न्यायालयाच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलला स्थगिती मिळाल्याने उमेदवारी वैध ठरते, असा युक्तिवाद केला.

रावराणे यांच्या मांडणीला निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी मान्यता दिल्याने पारकर यांची हरकत बाद करण्यात आली. त्यामुळे समीर नलावडे यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी कायम राहणार आहे, असे रावराणे यांनी पत्रकारांना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा