डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी आयोजित
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
सावंतवाडी
डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या वतीने कै. दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा उत्साहवर्धक समारोप रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स (अप्लाइड आर्ट), सावंतवाडी येथे झाला.
स्पर्धेत जिल्हाभरातून ३५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामाजिक भान, कला संवर्धन आणि विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशादर्शन मिळावे या उद्देशाने डी. जी. बांदेकर ट्रस्ट दरवर्षी विविध उपक्रम राबविते. कला जपणूक, जनजागृती, संवेदनशीलता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आयोजित होणारी ही चित्रकला स्पर्धा हा ट्रस्टचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याने अशा उपक्रमांची रेलचेल वर्षभरात या संस्थेमार्फत होताना दिसते.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी व्यासपीठावर संचालक (Chairman) श्री. गोविंद बांदेकर, सचिव सौ. अनुराधा परब, कोषाध्यक्ष श्रीमती गीता बांदेकर, कोर्स हेड प्रा. तुकाराम मोरजकरयांची प्रमुख उपस्थिती होती.
बाल गटातून प्रथम – सुधीक्षा सर्जेराव चव्हाण, द्वितीय – विघ्नेश प्रशांत तेली, तृतीय – जाई पंकज आपटे, पहिली ते चौथी गटातून प्रथम- नील ज्ञानेश जोशी, द्वितीय – प्रणिती निलेश कालेलकर, तृतीय – निर्विघ्न शरद पवार, पाचवी ते सातवी गटातून प्रथम – लावण्या नंदकिशोर केसरकर, द्वितीय – आराध्य नितीन सातवसे, तृतीय – प्राची समीर सावंत, आठवी ते दहावी गटातून प्रथम – इशिका सावंत, द्वितीय- तन्मय पुरुषोत्तम नेरुरकर, तृतीय – मोहित निळकंठ सुतार तर खुल्या गटातून प्रथम – समीर अशोक चांदरकर, द्वितीय – केदार सखाराम टेमकर, तृतीय – राम सूर्यकांत बिबवणेकर यांनी क्रमांक पटकावले. तसेच प्रत्येक गटासाठी सहभागी स्पर्धकाना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.
विजेत्यांमधून कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर यांनी बोलताना “अशा उपक्रमांमुळे मुलांच्या कलागुणांना चालना मिळते. विविध स्पर्धांमधून कला जोपासण्यासाठी योग्य प्रेरणा मिळते. पालकांनीही याकडे जागरूकतेने पाहून मुलांना कला क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे,” असे कौतुकपर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक सिद्धेश नेरुरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्राजक्ता वेंगुर्लेकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचे प्राचार्य उदय वेले तसेच फाउंडेशन कोर्सचे सर्व विद्यार्थी आणि स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले.
