You are currently viewing अस्तित्व

अस्तित्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अस्तित्व*

 

तू कुठेही असो

जिथे जाऊ तिथे

तुझं अस्तित्व‌ जाणवतं…

चराचरात व्यापून आहेस

हे ही समजतं!

तू प्रत्यक्षात दिसत नाहीस

तुझी जागा दिसत नाही…

म्हणून‌ तू नाहीस

असंही म्हणवत नाही!

येणे जाणे नाही इथे

कुणाच्याच हातात…

सारे दोर कठपुतळ्यांचे

तुझ्याच ताब्यात!

तू आहेस म्हणूनच

आहेत श्वास चालू…

चराचरात आहे चैतन्य भरून.

तू व्यापून राहिला आहेस

निरंतन हृदयात….

सारं आयुष्य अन्

आयुष्यातील सारं काही

आहे फक्त तुझा कृपाशीर्वाद,

तुझा कृपाशीर्वाद!

 

©️®️ डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा