You are currently viewing मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम लेख*

 

*मराठी भाषा दिन* 

 

आज मराठी भाषा दिन आपण साजरा करतोय. हा दिवस म्हणजे थोर कवी, लेखक, साहित्याचा संत शिरोमणी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन.

त्यांचा जन्म पुण्यात झाला. पण बालपण नाशिक जिल्हयात पिंपळगाव बसवंत येथे गेले. आणि महाविद्यालयीन शिक्षण मात्र नाशिक येथे झालं. आणि त्या नंतर ते ना शिकलाच स्थायिक झाले.

त्यांचं पुर्ण नावं विष्णु वामन शिरवाडकर होय.

गोदामाईचं खळखळतं पाणी, काठावरची ती घनदाट झाडी, नदीतिराची पुरातन दगडी मंदिरे, सोमेश्वराच्या खडकावर बसुन लुकलुक बघणारी, भिरभिरणारी फुलपाखरे, आणि उमलणारी ती रंगीत फुले पाहून कुसुमाग्रजांचं कवी मन बहरुन आलं.

आणि नकळत त्यांच्या ओठांवर सुंदरशा कविता रेंगाळू लागल्या. आणि अनेक रचनांची काव्यांजली तयार झाली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या प्रमाणे तासनतास झाडाखाली बसुन अनेक रंजक नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या विशाखा, किनारा, वादळवेल, हिमरेषl , इ. कवितासंग्रह प्रसिध्द झाल्या. विशाखा या काव्य संग्रहाला तर *ज्ञानपीठ पुरस्कार* मिळाला ज्याची प्रस्तावना वि. स. खांडेकरांनी लिहिलेली आहे. दुरचे दिवे, वैजयंती, राजमुकुट, नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटके. नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई (बिर्ला)

सभाग्रह येथे पार पडला. आणि आजही नटसम्राट रसिक जनांच्या तनमनात नांदत आहे. दर्दी रसिकांची गर्दी त्यांच्या या नाटकांना असायची.

सुख दुःखाच्या ऊन सावलीत रसिक मनाला आल्हाद दायक हास्य आणि आनंद जागवला तो कुसुमाग्रजांनी. उदास विन्मुख मनाला मराठी भाषेचं टॉनिक देवुन प्रसन्न करण्याची शक्ती त्यांच्या काव्यात आणि नाटकांत होती.

त्यांच्या बहिणीच नावं कुसुम होत. कुसुमेचा आग्रज म्हणजे भाऊ. म्हणुन कुसुमाग्रज. या नावानं आपण त्यांना ओळखु लागलो.

*माझ्या मराठी भाषेचा*

*लावा ललाटीस टिळा*

*हिच्या संगाने जागल्या*

*दऱ्या खोऱ्यातील शिळा*

या गीतातून किती प्रेम दिसतंय मराठी भाषेवर. मातीवर, आणि या धरतीवर.

अशा अनेक गीतांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं. आणि मराठी श्रोता मराठी भाषेवर प्रेम करु लागलाय. मराठी भाषेवर आपणास अभिमान हवा.

त्यांच्याच भाषेत सांगायचं तर

*लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी*. त्या प्रमाणे लाभले आम्हास भाग्य ते राहीले ज्या नगरीत त्या नगरीत राहण्याचे. आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतोय. त्यांनी लिहिलेली सुवर्ण अक्षराचे साहित्य आपण मन लावुन वाचतो. त्यांच्या कुसुमाग्रज वाचनालयात.

त्यांची आणि आपली कर्मभूमी नाशिक आहे. ही आपल्या करता भाग्याचीचं गोष्ट आहे.

नाशिकला टिळकवाडी भागात आजही त्यांचा टुमदार बंगला त्यांची आठवण करुन देतोय. बाजुस अंगण, तुळशवृंदावन, परसबाग आणि त्यांच्या नावाची ओळख करुन देणारा गेट आजही इतिहासाची आठवण करुन देतो. मी तर केव्हाही तिथे गेले तर त्यांचं नावं वाचून नकळत नतमस्तक होते..जणु आतुन ते मला आशीर्वाद देत आहेत. असा भास होतो. एवढ्या मोठ्या माणसांच्या अंगणात मला मंदिराबाहेर आल्याचा आनंद होतो.

आज संपूर्ण राज्यात त्यांचा जन्मदिन साजरा होतोय. पण ती व्यक्ती आपल्या घरातील नाशिकची आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.

जाता जाता त्यांच्याच ओठातुन म्हणेल

*जाता जाता गाईन मी*

*गाता गाता जाईन मी*

*मेल्यावरही या गगनातील*

*गीता मधुनी राहीन मी*

त्यांच्या सर्व गीतांना आणि मराठी भाषेला त्रिवार नमन करुन थांबते.

*धन्यवाद*

*शीला पाटील. चांदवड* .

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 2 =