You are currently viewing वेंगुर्लेत ढोल ताशांच्या गजरात श्री साईंच्या भव्य पालखी मिरवणुकीने साई मंदिर वर्धापनदिन उत्सवास प्रारंभ….

वेंगुर्लेत ढोल ताशांच्या गजरात श्री साईंच्या भव्य पालखी मिरवणुकीने साई मंदिर वर्धापनदिन उत्सवास प्रारंभ….

वेंगुर्ला
राज्य परिवहन वेंगुर्ला स्थानकावरील साई मंदिराच्या २४ व्या वर्धापनदिन उत्सवाला आज शुक्रवार १२ फेब्रुवारी ला प्रारंभ झाला. सकाळी गणेश पूजन व धार्मिक विधी करून वेंगुर्ला शहरात ढोल ताशांच्या गजरात श्री साईंची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

दोन दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. सायं.४ वा. श्री विठ्ठल रखुमाई पंचायतन सांप्रदाय, सुरंगपाणी-खानोली (दादा पंडित) यांचे भजन, सायं.६ वा. पालखी, आरती, सायं.७ वा.पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तर उद्या १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. महारुद्र जप सांगता, १० वा. साईबाबांची महापूजा, दु.११ वा. महाआरती व महानैवेद्य, दु.१२ वा. महाप्रसाद, सायं.४ वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, आडेली यांचे भजन, सायं.५ वा. फुगडी, सायं.६ वा.पालखी व आरती, सायं.७ वा. ओंकार कलामंच सावंतवाडी यांचा सदाबहार करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कोविड प्रार्दूभाव टाळण्यासंबंधीचे सर्व नियम पाळून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई मंदिर देवस्थान समिती व कर्मचारी वृंद राज्य परिवहन वेंगुर्ला आगार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा