You are currently viewing सातार्डा येथील वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलच्या सानिका नाईक व अद्विता दळवीचे सुयश….

सातार्डा येथील वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलच्या सानिका नाईक व अद्विता दळवीचे सुयश….

_*सातार्डा येथील वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलच्या सानिका नाईक व अद्विता दळवीचे सुयश….*_

सावंतवाडी

_सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय मंडळ सातार्डा आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थीनींनी सुयश प्राप्त केले. यामध्ये पाचवी ते सातवी या गटातून सातवीतील सानिका आत्माराम नाईक हिने प्रथम क्रमांक तर आठवी ते दहावी या गटातून नववीतील अद्विता संजय दळवी हिने तृतीय क्रमांक मिळवला._

_ग्रंथालयाच्या वतीने विजेत्या स्पर्धकांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._

प्रतिक्रिया व्यक्त करा