सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज भाजप तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
अर्ज दाखल करताना अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यासोबत श्रीरंग आचार्य, माजी नगरसेविका पुष्पलता कोरगावकर, व्यंकटेश शेट, एश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी होत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
