*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मोक्षमुक्ती*
〰️〰️〰️〰️
आता जिथे जाईन तिथेतिथे
एकांतता हवीहवीशी वाटते
जग सारेच सर्वार्थाने पाहिले
प्रारब्धाने कवटाळलेले होते
कसले हिशेब कसली गणिते
सारे गतजन्माचे भोगणे होते
मृगजळापाठी धावलो खरा
सत्य ते काहीसे वेगळेच होते
हव्यास सारेच असती व्यर्थ
हे मात्र कळूनी चुकले होते
कुणा कसे किती ते स्मरावे
लोचनी सारेच बंदिस्त होते
जे घडले ते दैवयोग भाळीचा
क्षणक्षण जगणे कर्तव्य होते
आता इच्छा न काही उरली
जन्माचे संचित संपले वाटते
ऋणमुक्तता हिच मोक्षमुक्ती
लाभावीशी असे जीवा वाटते
आता जिथे जाईन तिथेतिथे
एकांतता हवीहवीशी वाटते
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️ वि . ग. सातपुते.( भावकवी )*
📞 *(,9766544908)*
