सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग 7 मधून संदीप राणे व आर्या सुभेदार यांचा अर्ज दाखल
सावंतवाडी
आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने श्री. संदीप राणे व सौ. आर्या सुभेदार यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी श्री. श्रीधर पाटील व श्री. जिरगे यांच्याकडे दाखल करण्यात आला.
अर्ज दाखल करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर संघटक निशांत तोरस्कर, युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांसह सुजय सुभेदार, अंकिता सुभेदार, धनश्री वराडकर, मंदार सुभेदार, योगिता जामदार, दर्शना सुभेदार, प्रमोद सावंत, संदीप वेंगुर्लेकर, संदीप केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन्ही उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
