You are currently viewing भाजपा उमेदवार समीर नलावडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

भाजपा उमेदवार समीर नलावडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

भाजपा उमेदवार समीर नलावडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

कणकवलीत भाजपाचे शक्तीप्रदर्शन

कणकवली

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून समीर नलावडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या वेळी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी उमटली. निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे नलावडे यांनी आपला अर्ज सादर केला.

यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह बंडू हर्णे, गावचे मानकरी सदानंद राणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राजू गवाणकर, अण्णा कोदे, संदीप नलावडे, ॲड. विराज भोसले, बंडू गांगण, मेघा गांगण, प्रणाम कामत, राजा पाटकर, महेश गुरव, सुरेश सावंत, अनिस नाईक, विशाल कामत, राज नलावडे, पंकज पेडणेकर, विराज राणे, वागदे सरपंच संदीप सावंत, संजय ठाकूर, गंगाधर सावंत, सदानंद राणे, मनोज राणे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. विविध नाट्यमय घडामोडींनंतर अखेर समीर नलावडे यांचे नाव पक्षाकडून एकमुखाने निश्चित झाले. त्यानंतर उर्वरित उमेदवारांचीही नावे अंतिम करण्यात आली. महायुतीच्या चर्चांनी रंग चढले असतानाच आज औपचारिकरीत्या नलावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीच्या राजकारणाला वेग आला आहे.

भाजपाच्या शक्तीप्रदर्शनामुळे पुढील राजकीय वातावरण कसे बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा