आशिष शेलार यांचा सेनेला सणसणीत टोला
सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हाच धागा पकडत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. सरकार राणीच्या बागेत पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देते, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
आशिष शेलार यांनी शुक्रवारी यासंदर्भात ट्विट केले. यामध्ये म्हटले आहे की, भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं!
सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!”, असे शेलार यांनी म्हटले आहे.