You are currently viewing टागोर शिक्षण संस्थेत बाल दिन उत्साहात साजरा

टागोर शिक्षण संस्थेत बाल दिन उत्साहात साजरा

भोसरी, पुणे :

भारताचे पहिले पंतप्रधान आणि बालकांचे चाचा म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शाळेत मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.

टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन नंदकुमार विठोबा लांडे पाटील, उपाध्यक्ष महेश घावटे, सचिव सुरेश फलके व सूरज भाऊ लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मुलांच्या हास्य-उत्साहाने व मान्यवरांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भारावून गेला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. साळुंखे बिपीन यांनी भूषवले. यावेळी गुरव शिवाजी पर्यवेक्षक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला.

गायकवाड बी .ए. रवी खांदारे,कोळेकर एस .बी कदम बी .ई . पाटील दिलीप घाडगे के .वाय. संतोष सुलाखे ,सुखदेव बनसुडे . पाटील सुलोचना बिले विजय, विठ्ठल बुळे,आदि शिक्षक उपस्थित होते.

सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ व मनोगताने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थी भाषणे वेदिका विभुते इ. आठवी व कुंभार इ. पाचवी यांनी मनोगत व्यक्त केले. या विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंच्या बालप्रेम, आधुनिक भारताच्या उभारणीत केलेल्या त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याची माहिती देत भाषणं, देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ‘चाचा नेहरू आणि बालदिन’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मांडलेले विचार अतिशय प्रभावी होते.

आपल्या मनोगतात बिपीन साळुंखे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले. त्यांनी नेहरूंच्या विचारांचे स्मरण करून मुलांना शिक्षण, विज्ञानविषयक जागरूकता आणि राष्ट्र प्रेमाची प्रेरणा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम शिस्त, उत्साह आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन शरद तोरणे यांनी अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी पद्धतीने पार पाडले.

उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागामुळे पं नेहरू यांच्या जयंतीचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा