You are currently viewing मालवण नगराध्यक्षपदासाठी ममता वराडकरांची निवड निश्चित; शिवसेनेचा ए-बी फॉर्म सुपूर्द

मालवण नगराध्यक्षपदासाठी ममता वराडकरांची निवड निश्चित; शिवसेनेचा ए-बी फॉर्म सुपूर्द

आमदार निलेश राणेंच्या हस्ते अधिकृत मान्यता; शहर प्रमुख दीपक पाटकर व महेश कोयंडे यांच्यासह नगरसेवक उमेदवारांना फॉर्म वाटप सुरू

 

मालवण :

मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेविका ममता वराडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांनी त्यांना शिवसेना पक्षाचा अधिकृत ए-बी फॉर्म सुपूर्द करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, प्रभाग तीन मधून शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांना नगरसेवक पदासाठी ए-बी फॉर्म देण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधून महेश कोयंडे यांनाही ए-बी फॉर्म देण्यात आला आहे.

शिवसेना पक्षाकडून सर्व नगरसेवक उमेदवारांना ए-बी फॉर्म वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून रविवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शिवसेना पक्षाचे उमेदवार अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा